धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब मलबार हिल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीसमित्र योजनेअंतर्गत विठ्ठल भाई पटेल रोड पोलीस ठाणे यांचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांचे करिता वैद्यकीय शिबिराचे आयोजन दिनांक १४ ऑक्टोबर, २०२३ रोजी शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत यशोमंगल हॉल, फडकेवाडी येथे करण्यात आले होते. या शिबिरात १०५ जणांची BMI इंडेक्स, रक्तदाब, मधुमेह आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. सर्वांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.