धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट (फडके श्री गणपती मंदिर) आणि योगप्रणाली यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्दी डाएट आणि रेकी हीलिंग या विषयावर श्रीमती नेहा जैन यांचे व्याख्यान आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५:३० या वेळेत ट्रस्टच्या यशोमंगल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. मानवी जीवनात योगाभ्यासाबरोबर पोषणाचे ( आहाराचे ) सुद्धा तितकेच महत्त्व आहे. तसेच रेकी हीलिंग या प्रणाली द्वारे आपण बऱ्याच पद्धतीने माणसाच्या शरीरावर तसेच मनावरही उपचार करता येतात. याचे परिणाम अतिशय चांगले होतात. हे श्रीमती नेहा जैन यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये स्लाईड शोध द्वारे दाखवून दिले. एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी ट्रस्टचे विश्वस्त आणि पदाधिकारी तसेच योगप्रणाली या संस्थेचे श्री. पाताडे सर व सौ. पाताडे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानले. या पुढील काळातही फडके श्री गणपती मंदिर ट्रस्ट अशाच पद्धतीचे समाजपयोगी आणि मानवी जीवन मूल्यांना समोर ठेवून एकापेक्षा एक आगळे वेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे तरी सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती की या सर्व कार्यक्रमांना आपण जास्तीत जास्त उपस्थिती लावून याचा लाभ जरूर घ्यावा.