धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्नदान या समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ६५ गरजूंना दानशूर व्यक्तींनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तसेच वैयक्तिक देणग्यांमधून शिधावाटप केले गेले. हा कार्यक्रम संस्थेच्या यशोमंगल सभागृहात सकाळी ११ वाजता झाला. आर्यन एज्युकेशनच्या शारदा सदन शाळेचे श्री बढे सर तसेच SL and SS high school च्या श्रीमती गावडे, श्रीमती साळुंखे आणि श्रीमती देसाई या शिक्षिका उपस्थित होत्या. ट्रस्टतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी आणि प्रमुख गुरुजी श्री.गजानन केळकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांना श्री. उमेश थळे, सौ.अनुष्का जोशी , श्री. बाळकृष्ण कुलकर्णी आणि श्री. धोंडीभाऊ हांडे यांनी सहकार्य केले.