धी य. गो. गं. फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि मलबार हिल रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६~११~२३ रोजी सकाळी ११वाजता दिवाळी फराळ देण्यात आला.दानशूर दात्यांनी दिलेल्या भरघोस देणग्यांतून आज संस्थेच्या यशोमंगल सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ४२ विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. या कार्यक्रमात रोटरी क्लब मलबार हिलच्या सौ. प्रेरणा अय्यर या प्रमुख पाहुण्या होत्या.आर्यन हायस्कूलच्या शिक्षिका सौ. उज्वला उघाडे उपस्थित होत्या. फडके मंदिरातर्फे विश्वस्त श्री. सुरेश डोंगरे आणि त्यांच्या सौ. दीप्ती डोंगरे होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी यांनी श्री. उमेश थळे ,सौ. अनुष्का जोशी, सौ. गायत्री जोशी,श्री. धोंडीभाऊ हांडे आणि श्री. अविनाश वेदपाठक यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी केला.