काल दिनांक २९~७~२३ रोजी रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना बीपी मीटर आणि ग्लुकोज मीटर वाटप करण्याचा कार्यक्रम धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब मलबार हिल यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या यशोमंगल हॉलमध्ये संपन्न झाला. ट्रस्टतर्फे विश्वस्त सुरेश डोंगरे, रोटरी क्लबतर्फे सौ. दीप्ती डोंगरे, पल्लवी मॅडम, फाल्गुनी मॅडम आणि सहकारी उपस्थित होते. भाटिया रुग्णालयाचे डॉ.अभिषेक सुभाष, डॉ.गौरव पाटील आणि सहकारी यांनी मार्गदर्शन केले. श्री. केळकर गुरुजी आणि श्री. बाबरे गुरुजी यांनी शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी यांनी केले. श्री. बाळकृष्ण कुलकर्णी, श्री. उमेश थळे, सौ अनुष्का जोशी, श्री. अविनाश वेदपाठक, श्री. सचिन फडके, श्री. धोंडीभाऊ हांडे आणि कार्यकर्त्यांच्या टीमने या कामी सहकार्य केले. सर्व रुग्णांच्या सहकार्यामुळे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.