पितृपक्षात केलेल्या आवाहनानुसार दानशूर दात्यांनी दिलेल्या भरघोस देणग्यांतून आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजता अन्नदानाचा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या यशोमंगल सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ३५ गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या परिवारांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली. या कार्यक्रमात आर्यन हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती साबळे, शिक्षक श्री. तांबे हे उपस्थित होते. फडके मंदिरातर्फे विश्वस्त श्री. सुरेश डोंगरे आणि श्री. मिलींद वझे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत जोशी यांनी चांगले आयोजन केले. त्यांना श्री. उमेश थळे ,सौ. अनुष्का जोशी,श्री. धोंडीभाऊ हांडे आणि श्री. अविनाश वेदपाठक यांनी मदत केली.


