Skip to content Skip to footer

अन्नदान 20 ऑक्टोबर 2023

पितृपक्षात केलेल्या आवाहनानुसार दानशूर दात्यांनी दिलेल्या भरघोस देणग्यांतून आज दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजता अन्नदान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या यशोमंगल सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ६० गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या परिवारांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली. या कार्यक्रमात आर्यन हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती बोडके, शिक्षक श्री. भोईर आणि श्री.सोलकर हे आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. वारणकर सर यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. फडके मंदिरातर्फे श्री. हेमंत जोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. त्यांना श्री. उमेश थळे ,सौ. अनुष्का जोशी आणि श्री. धोंडीभाऊ हांडे यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

mrमराठी